ठाकरेंनी आमच्यासोबत यावे; शिंदे गटाची ऑफर

0
13

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी 

आगामी महापालिका निवडणुकांसदर्भात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या शिवसेनेकडून मोठी माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी निवडणुकीसंदर्भात मोठे विधान केले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप एकत्र लढणार आहेत. उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एकिकडे सुप्रीम कोर्टात शिवसेनेतील उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाबाबतची खटल्याची सुनावणी महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपली असताना उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) शिंदेसेनेत सहभागी होण्याचे आवाहन शिंदे गटातर्फे केले गेले आहे. त्यामुळे शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केवळ मुंबईच नाही तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुक शिवसेना भाजप एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले आहे. आम्ही काल शिवसेनेत होतो, आज आहोत आणि उद्याही राहणार आहोत. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप शिवसेना युती करून लढणार आहे. भाजप शिवसेना युतीचीच सत्ता मुंबई महापालिकेवर येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सुप्रीम कोर्टात आज शिवसेना विरोधात शिंदे सेनेच्या खटल्यावर राहुल शेवाळेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कोर्टातला आजचा युक्तिवाद चांगला झाला. सोमवारी सुप्रीम कोर्ट हा खटला मोठ्या घटनापीठाकडे पाठवण्याचा निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे न्यायालयाने मान्य केले आहे. निवडणूक आयोगाने ज्या दोन्ही पक्षाची सुनावणी ठेवलेली आहे, त्या संदर्भात कोर्टाचा निर्णय येईपर्यंत निर्णय घेऊ नका अशी सूचना केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सोमवारी कोर्ट काय सूचना देते, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

राजकीय फायद्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभाग रचनेत बदल केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यावर शेवाळे म्हणाले, यापूर्वी प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय राजकीय लाभासाठीच घेण्यात आला होता. आता प्रभाग रचनेबाबत तक्रारी आल्या म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तो निर्णय बदलला आहे. आदित्य ठाकरेंकडून होणाऱ्या टिकेला आता लोक कंटाळले आहेत. त्यामुळे लोकांनी आता कामावर लक्ष केंद्रित करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here