दहशत माजविणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

0
11

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

शहरातील जारगाव चौफुली परिसरात बेकायदेशीररित्या हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत करून त्याला अटक केली आहे. विशाल पंकज देसले (वय २०, रा. जारगाव ता.पाचोरा) असे अटक केलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस हवालदार योगेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पाचोरा शहरातील जारगाव चौफुली येथे संशयित आरोपी विशाल देसले हा हातात तलवार घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपी विशाल देसले याला अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. तपास पो.हे.कॉ. सचिन निकम करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here