मालदाभाडीजवळ भीषण अपघात, तीन जण जागीच ठार

0
6

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

जामनेर ते बोदवड रस्त्यावरील मालदाभाडीजवळील वाडीकिल्ला गावाजवळ दुचाकी-मोटार सायकलचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. त्यात दोन दुचाकी एकमेकांना धडकल्यानंतर कारने दोन्ही दुचाकींना उडविले. बोदवडहून जामनेरकडे जाणाऱ्या दत्तू रामा माळी आणि सुनील भोई यांच्या दुचाकीचा वाडीकिल्ला येथून मालदाभाडी येथे जाणारे ईश्‍वर त्र्यंबक पारधी यांच्या दुचाकीची धडक झाली. यामुळे दोन्ही वाहने रस्त्यावर पडले. त्यातच भरधाव वेगात असलेल्या मागून आलेल्या कारने या दोन्ही दुचाकींना धडक दिली. अपघातात दत्तू रामा माळी, सुनील भोई आणि ईश्‍वर पारधी यांचा मृत्यू झाला. तसेच कारमधील तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्यांना रूग्णालयात दाखल केले. अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. याबाबत रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here