नेपाळमध्ये भीषण अपघात : भुसावळ तालुक्यातील 17 यात्रेकरुंना जलसमाधी

0
51
नेपाळमध्ये भीषण अपघात भुसावळ तालुक्यातील 17 यात्रेकरुंना जलसमाधी-saimatlive.com

साईमत भुसावळ प्रतिनिधी

तालुक्यातील वरणगाव आचेगाव,तळवेल व पिंपळगाव येथील यात्रेकरुंची एक खाजगी ट्रॅव्हल बस नेपाळमधील तानाहुं जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरातील मोर्सरयांनी नदीत कोसळल्याने झालेल्या दुर्दैवी अपघातात 16 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आल्याने तालुक्यासह जिल्हयावर शोककळा पसरली आहे.

भुसावळ तालुक्यातील 39 यात्रेकरू पोखराहुन काठमांडूकडे निघाले होते. त्यातील जवळपास 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजते. भुसावळ तालुक्यातील तळवेल,पिंपळगाव,आचेगाव आणि परिसरातील 39 यात्रेकरुंना देवदर्शन आणि पर्यटनासाठी घेऊन जाणारी खाजगी बस नेपाळ येथील पोखरानजीकच्या नदीत कोसळली.या घटनेत 17 भाविकांवर मृत्यू ओढवला आहे.
याबाबतची माहिती मिळाल्यावर याबाबत मदत कार्यावर केंद्रीय राज्यमंत्री ना.रक्षाताई खडसे व आ.एकनाथराव खडसे हे वरणगाव येथे पोहचले व मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. आमदार संजय सावकारे हे तातडीने नेपाळला रवाना झाले आहेत.

नेपाळमध्ये आज शुक्रवारी सकाळी उत्तर प्रदेश पासिंगच्या एका बसचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. ही बस (युपी ५३ एफटी ७६२३) या क्रमांकाची होती. ही बस पोखरा येथून काठमांडू येथे जात होती. भरधाव वेगाने धावणारी ही बस तणाहून जिल्ह्यातल्या मार्सयांगडी नदीच्या पात्रात जाऊन पडली. या बसमध्ये 41 प्रवाशांसह चालक व क्लिनर असे एकूण 43 जण बसमध्ये प्रवास करत होते. यातील 17 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, इतर अन्य 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या बसमधील बहुतांश प्रवाशी है वरणगाव व तळवेल येथील असल्याची माहिती समोर आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे यातील काहीजण हे राजकीय व प्रतिष्ठित शेतकरी कुटुंबातील आहेत. या अपघाताची माहिती मिळताच या संदर्भात केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी तातडीने माहिती घेवून मदत कार्यात मदत केली. तर आमदार एकनाथराव खडसे यांनी देखील रक्षाताईंसोबत अपघातातील जखमींची व्हिडीओ कॉलवरून विचारपूस केली.

आणि सातत्याने करत आहेत. तसेच आमदार संजय सावकारे यांनी देखील तातडीने अपघातात जखमी झालेल्यांशी व्हिडीओ कॉल करून संवाद साधून त्यांना धीर दिला.
वरणगांव येथील रहिवासी माजी नगरसेवक सुधाकर जावळे यांच्या सोबत 31 जण नेपाळ येथे श्री परशुराम देवस्थानला जात असताना बस नेपाळ येथे नदीत कोसळल्याने आत्ता पर्यंत 17 शव बाहेर काढण्यात यश आले आहे.युध्दपातळीवर यंत्रणा मदत कार्य करीत आहे.दरम्यान या दुर्दैवी घटनेची चर्चा वाऱ्यासारखी भुसावळ तालुक्यात आणि संपूर्ण जिल्ह्यात पसरली असून शोक व्यक्त होत आहेत.आताच मिळालेल्या माहितीनुसार , भुसावळचे आमदार संजय सावकारे ,भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे ,परीक्षित बऱ्हाटे हे तातडीने इंदौरहुन नेपाळकडे रवाना झाले आहेत.

ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे पण घटनेची माहिती घेत असून दूतावास यांच्याशी संपर्क त्यांनी साधला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here