आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
साईमत वरणगाव प्रतिनिधी
वरणगाव शहरातील मकरंद नगर भागातील रहीवासी असलेल्या टेन्ट व्यावसायीकाने रात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली . या घटनेबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील सुधीर लीलाधर पाटील ( वय – ५२ ) यांचा टेन्ट हाऊसचा व्यवसाय होता . मात्र, काही दिवसापासुन त्यांची मानसिक स्थिती बिघडली होती . यामुळे त्यांनी मकरंद नगर मधील आपल्या राहत्या घरात छताला दोरी बांधून गळफास घेतल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली . या घटनेची खबर मयताचे मोठे भाऊ सतीष पाटील यांनी पोलीस ठाण्यात दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ . प्रमोद कंखरे तपास करीत आहेत .