जिल्हा निवड समितीकडून निवड केल्याचे पत्र प्राप्त
साईमत/यावल/प्रतिनिधी :
जळगाव जिल्ह्यातून यावल, भुसावळ, पारोळा येथील टॉप मोस्ट उत्कृष्ट तहसीलदार म्हणून जिल्हा निवड समितीने निवड केल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यात यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचे जळगाव जिल्ह्यासह नाशिक विभाग महसूल विभागातर्फे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुळ कायदा तहसीलदार तथा निवड समिती सदस्य विजय सूर्यवंशी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी जळगाव गजेंद्र पाटोळे यांच्या निवड समितीचे पत्र बघितल्यावर त्यात टॉप मोस्ट उत्कृष्ट तहसीलदार म्हणून भुसावळ येथील नीता लबडे, यावल येथील तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, पारोळा येथील तहसीलदार उल्हास देवरे यांच्यासह इतर काही तहसिलदारांची उत्कृष्ट तहसीलदार निवड केल्याचे पत्र १५ ऑगस्टनिमित्त देण्यात आले आहे. उत्कृष्ट तहसीलदार म्हणून निवड झाल्याने सर्व अधिकाऱ्यांवर महसूल विभागातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.