कुऱ्हे (पानाचे) येथे ३३ वर्षानंतर ठरली अविस्मरणीय भेट
साईमत/भुसावळ/प्रतिनिधी
तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयातील १९९०-१९९१ मधील दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तब्बल ३३ वर्षांनी एकत्रित येत नुकताच उत्साहात घेण्यात आला. स्नेह मेळाव्याला राज्यभरातून विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्यात शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एकनाथ बडगुजर होते. त्यांनी लवकरच सर्व सुविधायुक्त ज्युनियर कॉलेज सुरु करण्याचा संकल्प व्यक्त केला.
प्रदीर्घ काळानंतर भेटलेल्या शिक्षकांचे माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारापासून सभागृहापर्यंत वाजत-गाजत जल्लोषात स्वागत केले. त्यात आजी-माजी शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थेचे अध्यक्ष यांचा समावेश होता. याप्रसंगी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनासह सरस्वती पूजन करण्यात आले.
मेळाव्यात माजी विद्यार्थी प्रा.विकास उंबरकर, अनिल पारधे, महादेव कोळी यांनी मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच माजी शिक्षक चांदासर, वाय.के. सर, के. जे बडगुजर, विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक एस. पी चौधरी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी लेखक आर. डी. कोळी यांचे बहुचर्चित ‘सलाम’ पुस्तक भेट देण्यात आले.
उपस्थितीत मान्यवरांचा समावेश
मेळाव्याला एकनाथ बडगुजर, शशिकला बडगुजर, आर. टी. बारी, चांदा सर, वायके सर, डी. डी. पाटील, के. जे. बडगुजर, एस. पी. चौधरी, एस. डी. वाघ, रामकृष्ण पारधे, पुंडलिक सपकाळे, नरेश बडगुजर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांची लाभली उपस्थिती
मेळाव्यात लाभलेल्या माजी विद्यार्थ्यांमध्ये समाधान बडगुजर, राजू कोतवाल, विश्वनाथ बारी, विकास महाजन, अंबादास बडगुजर, किशोर बडगुजर, गोपाळ बडगुजर, विष्णू बारी, विठ्ठल बारी, महादेव कोळी, चंद्रकांत पवार, धनराज ठोंबरे, देवानंद शिंदे, प्रा.विकास उंबरकर, अनिल पारधे, विश्वनाथ वाढे, धनराज सावळे, समाधान खलसे, राजू चौधरी, लोटू बारी, संजय वराडे, भगवान सोनवणे, लक्ष्मण जाधव, निलिमा पाटील, सुनीता पाटील, निलिमा बडगुजर, मीना राजपूत, रवींद्र गायकवाड, उमेश कुलकर्णी, गणेश जगताप, प्रकाश पाटील, अर्जुन ठाकरे, राजू तायडे, विजय अवसरमोल, सुरेश कापसे, प्रमोद गांधेले, राजेंद्र कोळी, कुमुद सरोदे यांचा समावेश होता. सूत्रसंचालन आर. डी. कोळी तर प्रास्ताविक तथा आभार प्रमोद गांधेले यांनी मानले.