Education Officer’s Office In Jalgaon : जळगावात माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक संघटनांचे धरणे आंदोलन

0
23

आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांचा सहभाग

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी तसेच आ.सत्यजित तांबे यांच्यासोबत झालेल्या सभेतील निर्णयांची कार्यवाही करणे, कार्यालयातील दप्तर दिरंगाईबाबत जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, इतर सर्व सहयोगी संघटनांच्यावतीने मंगळवारी, १७ जून रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विविध घोषणा दिल्या. आंदोलनानंतर श्रीमती सुर्वे यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागणीचे निवेदन स्वीकारले.

आंदोलनात ज.जि. माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष एच.जी.इंगळे, सचिव एस.डी.भिरुड, ज्येष्ठ शिक्षक नेते आर.एच. बाविस्कर, संभाजी पाटील, जे.के.पाटील, मुख्याध्यापक संघाचे गोपाळ पाटील, सी.के. पाटील, जिल्हा प्राध्यापक संघटनेचे सुनील गरुड, शैलेश राणे, डी.ए.पाटील, प्रदीप वाणी, एन.ओ. चौधरी, अरुण सपकाळे, किरण पाटील, गोपाळ पाटील, के.टी.तळेले, गोपाळ महाजन, जे.पी.सपकाळे, अजय पाटील, आर.डी.चौधरी, तुषार बोरसे, गिरीश भारंबे, डिगंबर पाटील, चंपालाल चौधरी, एम.ए.पाटील, सुनील तायडे, एल.एच.तायडे, राजेश जाधव, सतिशकुमार पवार, एस.के.पाटील, नरेश फेंगडे, नितीन महाजन, पुष्पा पाटील, साधना लोखंडे, चारुलता पाटील, आश्विनी कोळी यांच्यासह इतर सर्व महिला संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी संघटनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here