सर्व शाळेतील सर्व शिक्षकांचे शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचे कौतुक
साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात कार्यरत, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या तसेच शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान असणाऱ्या लोहारा-कुऱ्हाड गटातील सर्व माध्यमांच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक, माध्यमिक शाळेतील शिक्षक, केंद्र प्रमुख अशा ३८ शिक्षकांना ‘उपक्रमशील शिक्षक’ गौरव पुरस्काराने सन्मानचिन्ह, गौरवपत्र देऊन भाजपा, पंचायत राज ग्रामविकास विभाग पदाधिकाऱ्यांच्यावतीने नुकतेच सन्मानित करण्यात आले. मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शरद सोनार, सुनील क्षीरसागर, कैलास चौधरी, रमेश शेळके, किसन पाटील, चंद्रकांत पाटील, शिवराम भडके, पर्यवेक्षक पी.एम.सुर्वे, डॉ.प्रितिष चौधरी यांच्या संकल्पनेतून तसेच भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास विभागातर्फे कार्यक्रम घेण्यात आला.
लोहारा-कुऱ्हाड गटातील सर्व शाळेतील सर्व शिक्षकांचे शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान आहेच. अशा सर्वांचा सन्मान करण्यासाठी प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाची निवड मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी एस.आर.भडके, पी.एम.सुर्वे, भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर काळे, जामनेर विधान क्षेत्र प्रमुख शरद पांढरे, तालुकाध्यक्ष राहुल राजपूत, गटप्रमुख चंद्रकांत पाटील, शरद सोनार यांच्या संगनमताने करण्यात आली.
यांचा होता ३८ सत्कारार्थींमध्ये समावेश
सत्कारार्थींमध्ये भावना विश्वासराव सोनवणे साजगाव, कल्पना तुकाराम पाटील बिल्दी, कमलबाई पंडित पाटील खेडगाव, रमेश रामदास महालपुरे, वेरूळी बु., रवींद्र आनंदा खैरे वेरुळी खु., प्रदीप ज्ञानेश्वर पाटील गोराडखेडा, राजेंद्र रामदास पिंपळसे आर्वे, मनोहर नथू पवार जामने, सतीश रामदास आठवे सार्वे, राजू रामा पाटील कोकडीतांडा, अनिल रमेश पाटील कोकडी तांडा, दिनेश आबासाहेब पाटील वडगाव आंबे, उर्मिला विष्णू पाटील वडगाव जोगे, सुभाष रामचंद्र लोखंडे सांगवी, संजय रामदास पद्मे नाईक नगर, चंद्रकांत शिवाजी पाटील कुराड बुद्रुक, कविता संतोष चव्हाण कुऱ्हाड तांडा, सागर साहेबराव पाटील लाख तांडा, गणेश लोटन पाटील कुऱ्हाड बुद्रुक, प्रतिभा शालिग्राम बडगुजर कुऱ्हाड खुर्द, प्राजक्ता तुषार जळतकर म्हसास,
सुभाष साईदास पवार कळमसरा, किशोर तुळशीराम चौधरी कुंभारखान, रत्नाकर राघव पाटील शहापुरा, शंकर भगतसिंग परदेशी कासमपुरा, मुकुंदा भगवान वारंगणे लोहारा, लिना नानाभाऊ पवार लोहारा, शेख वसीम शेख लतीफ लोहारा, तुकाराम नारायण पाटील लोहारा, शे.इस्माईल सुलेमान लोहारा, राजू रफिक पटेल कुऱ्हाड केंद्र, सुरेश माधवराव पाटील कुऱ्हाड, गणेश माणिक शिंदे कळमसरा, सुनील शिवाजी चौधरी वरखेडी, विजेंद्र नथू पाटील म्हसास, अनिल दिगंबर वाघुळदे कासमपुरा, योगेश विष्णू चौधरी लोहारा, शकीर खान शब्बीर खान कऱ्हाड यांचा समावेश होता. त्यांना शाल,पुष्पगुछ, सन्मानचिन्ह, गौरवपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यांची लाभली उपस्थिती
यावेळी जामनेरच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन, शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन संजय गरुड, सेवानिवृत्त अभियंता जे.के.चव्हाण, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अरविंद देशमुख, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम निकम, जि. प. सदस्य मधुकर काटे, पं.स. माजी सभापती छगन झाल्टे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गोविंद आग्रवाल, शैलेश बारी, पं.ग्रा.वि.विधानसभा क्षेत्रप्रमुखशरद पांढरे, तालुकाध्यक्ष राहुल राजपूत, विलास राजपूत, पितांबर भावसार, राहुल पाटील, मुख्याध्यापिका उज्ज्वला शेळके, सरपंच अक्षय जैस्वाल, उपसरपंच दीपक खरे, ग्रा.पं.सदस्य कैलास चौधरी, सुरेश चौधरी, संभाजी चौधरी, अनिल तडवी, अतुल कोळी, श्रीराम कलाल,
विकासोचे चेअरमन प्रभाकर चौधरी, डॉ. सुभाष घोंगडे, डॉ. देवंेद्र शेळके यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते, लोहारा शिक्षक वृंद, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, सर्व कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक शिवराम भडके, सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील तर आभार कैलास चौधरी यांनी मानले.