सर्व पतंजली योग शिक्षिकांचा सन्मान
साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :
येथील पतंजली महिला समिती यांच्या वतीने सर्व पतंजली योग शिक्षिकांचा सन्मान करुन शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्यकारिणी सदस्या महानंदा पाटील होत्या.दीपप्रज्वलन प्रा.दिनेश राठी, स्वाभिमानचे प्रजापती भवरलाल यांच्याहस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक दंगल पाटील यांनी शिक्षक दिन व योगा विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात योग शिक्षिका सेवा देत आहेत. त्यांच्यासह सर्वांना शिक्षक दिना निमित्त भेटवस्तू देऊन सत्कार केला. तसेच यावेळी महानंदा पाटील, अंजली वाघमारे, वर्षा लोखंडे, मंदाकिनी केदारे, राजश्री बादशाह, मिना राजपूत, वंदना जंगले, पुनम संकला, माला चौधरी, सुरेखा पाटील, निलीमा पाटील, हेमा पाटील, ललिता चौधरी, प्रभाकर झांबरे, टी.एस. बाविस्कर या योगशिक्षिकांचा सत्कार करण्यात आला.
मंदाकिनी केदारे यांनी गुरुवर्यांसाठी कविता सादर केली. योगशिक्षिका वर्षा लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आभार अंजली वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमास चहाची व्यवस्था संत धाम योग वर्ग योगशिक्षिका राजश्री बादशहा यांनी केली होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगिनी योग वर्ग यांनी सहकार्य केले.



