माजी महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील मेहरुणमधील रामेश्वर कॉलनी भागातील स्थित किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये बुधवारी, २० ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची जयंती ‘सद्भावना दिवस’ म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी माजी महापौर जयश्रीताई महाजन यांनी स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण केले. सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी मिळून सद्भावना दिनानिमित्त सद्भावना शपथ घेतली.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांच्यासह सरोज पाटील, सरला फिरके, आशा महाजन, प्रफुल्ल नेहते, विकास नेहते, विजय चौधरी, केतन बऱ्हाटे, श्री.खंडारे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुशिल सुरवाडे यांनी केले.