पंकज शैक्षणिक, सामाजिक संस्थेतर्फे शिक्षक कार्य गौरव पुरस्कार

0
10

आर.डी.पाटील, विजया पाटील निवडपत्र देऊन सन्मानित

साईमत।चोपडा।प्रतिनिधी।

येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे शिक्षक दिननिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन संचालक पंकज बोरोले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक एम.व्ही.पाटील, व्ही.आर.पाटील यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमात संस्थेअंतर्गत कार्य गौरव सन्मान देण्याची परंपरा या वर्षापासून सुरू केली आहे. संस्थेतर्फे २०२४ साठी आर.डी.पाटील यांची प्राथमिक विभाग आणि श्रीमती विजया पाटील यांची माध्यमिक विभागातून निवड जाहीर करण्यात आली. त्याबद्दल निवडपत्र देऊन दोघांचे अभिनंदन करून सन्मानित करण्यात आले.

दोन्ही शिक्षकांचे अनेकांकडून कौतुक

आगामी काळात संस्थेतर्फे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून कार्य गौरव सन्मान दिला जाईल, असे पंकज बोरोले यांनी जाहीर केले. सन्मान प्राप्त झाल्याबद्दल दोन्ही शिक्षकांचे संस्थाध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक नारायण बोरोले, भागवत भारंबे, गोकुळ भोळे, सचिव अशोक कोल्हे यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here