समता सैनिक दलातर्फे ३० सप्टेंबरला तालुकास्तरीय भव्य रॅली

0
25

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील समता सैनिक दलाच्या केंद्रीय कार्यालयात येत्या ३० सप्टेंबर २०२३ रोजी चाळीसगाव येथे तालुकास्तरीय भव्य रॅली काढण्यासंदर्भात नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. ही बैठक समता सैनिक दलाचे मुख्य केंद्रीय प्रचारक धर्मभूषण बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

आंबेडकरी चळवळ सक्षम करण्यासाठी आणि अन्याय, अत्याचाराच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी, अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी, अन्यायग्रस्त जनतेची एकजूट करण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी रॅली आयोजित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. रॅली यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घ्यावी, असे आवाहन बागुल यांनी केले. बैठकीत चाळीसगाव तालुक्यातील वेगवेगळ्या २५ ते २६ गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा प्रचारक स्वप्नील जाधव यांनी करून बैठकीचा हेतू विशद केला. यशस्वीतेसाठी स्वप्नील जाधव, तालुका प्रचारक नितीन मरसाळे, बाबा पगारे, तालुका प्रचारक विशाल पगारे, दीपक बागुल यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here