विविध शाळांमधील कुस्तीपटूंनी नोंदविला सहभाग
साईमत/ न्यूज नेटवर्क/ मुक्ताईनगर :
तालुक्यातील सुकळी येथील नवीन माध्यमिक विद्यालयात मुक्ताईनगर तालुकास्तरीय स्पर्धेत सुरुवात झाली. स्पर्धेचा शुभारंभ कुस्ती स्पर्धेने झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी.पी. दाणे होते. याप्रसंगी तालुका क्रीडा कार्यालयाचे ज्ञानदेव येवले उपस्थित होते. याप्रसंगी मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी हायस्कुल, चांगदेव येथील एस.बी.चौधरी विद्यालय, उचंदे येथील घाटे विद्यालय, मुक्ताईनगर येथील ई. के.टॅलेंट स्कुल तसेच मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय आदी शाळांमधील कुस्तीपटूंनी सहभाग नोंदविला. त्यासाठी मयूर महाजन, उमाळे, सुभाष गायकवाड, विकास पाटील या तालुक्यातील शिक्षकांनी उपस्थिती दिली.
स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातून 35 किलोग्रॅम वजन गटात प्रथम सुकळी विद्यालयाचा विद्यार्थी गोपाल धनगर, 44 किलोग्रॅम वजन गटात चांगदेव हायस्कुलचा विद्यार्थी चांगदेव म्हस्के प्रथम तर सुकळी विद्यालयाचा विद्यार्थी आतिश इंगळे याने द्वितीय क्रमांक पटकावला. 48 किलोग्रॅम वजन गटात सुकळी विद्यालयाचा यश पाटील प्रथम तर 57 किलोग्रॅम वजन गटात चांगदेव हायस्कुलचा विद्यार्थी हेमंत भोई प्रथम, सुकळी हायस्कूलचा विद्यार्थी संतोष कोळी याने द्वितीय, 17 वर्षे वयोगटात 41 ते 45 वजन गटात सुकळी हायस्कुलचा विद्यार्थी गौरव कोचुरे याने प्रथम तर इ.के.टॅलेंट स्कुल मुक्ताईनगरचा विद्यार्थी अमन खान याने द्वितीय क्रमांक पटकावला. 48 किलोग्रॅम वजन गटात सुकळी हायस्कुलचा खेमराज कोळी प्रथम, 60 किलोग्रॅम वजन वयोगटात सुकळी विद्यालयाचा विद्यार्थी मयूर इंगळे प्रथम तसेच 65 किलोग्रॅम वजन गटात सुकळी हायस्कुलचा विद्यार्थी ओम पाटील प्रथम, 71 किलोग्रॅम वजन गटात सुकळी हायस्कुलचा विद्यार्थी राजेश मोरे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
यांनी घेतले परिश्रम
याबद्दल रामदेव बाबा बहुउद्देशीय संस्थेचे संचालक डॉ.दिलीप पानपाटील यांनी तसेच मुख्याध्यापक पी.पी.दाणे यांनी खेळाडूंचे कौतुक केले. सुकळी हायस्कुलचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय फेगडे तसेच राजेंद्र वाघ यांनी पंच म्हणून काम पाहिले. यशस्वीतेसाठी उपशिक्षक शरद बोदडे, शरद चौधरी, वैशाली सोनवणे, विशाल काकडे, मंगेश दांडगे, संदीप पावरा तसेच शिक्षकेतर कर्मचारी नवल कोळी, अनिल चौधरी, विजया सोनवणे यांनी परिश्रम घेतले.