देवळी आश्रमशाळेत तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा उत्साहात

0
60

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

चाळीसगाव तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, देवळी येथे नुकत्याच घेण्यात आल्या. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदित्य सूर्यवंशी यांनी केले. यावेळी चाळीसगाव तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, एरंडोल तालुका क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण, तालुका क्रीडा समन्वयक अजय देशमुख, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सतीश पाटील, तुषार खैरनार आदी उपस्थित होते. चाळीसगाव तालुक्यातील अनेक शाळेतील १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या संघांनी क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला.

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये प्रथम क्रमांक आश्रमशाळा, देवळी, द्वितीय क्रमांक माध्यमिक विद्यालय, खेडगाव, तृतीय क्रमांक जयहिंद विद्यालय, चाळीसगाव तसेच मुलींमध्ये प्रथम क्रमांक शिवाजी माध्यमिक विद्यालय, टाकळी प्र.दे., द्वितीय क्रमांक हॅरीसन पब्लिक स्कूल, तृतीय क्रमांक माध्यमिक विद्यालय, खेडगाव या संघांनी यश संपादन केले. १७ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये प्रथम क्रमांक आश्रमशाळा, मेहुणबारे, द्वितीय क्रमांक आश्रमशाळा, करगाव, तृतीय क्रमांक आश्रमशाळा, देवळी. तसेच मुलींमध्ये प्रथम क्रमांक शिवाजी माध्यमिक विद्यालय, टाकळी प्र.दे., द्वितीय क्रमांक आश्रमशाळा, राजदेहरे, तृतीय क्रमांक आश्रमशाळा, देवळी या संघांनी यश संपादन केले. १९ वर्षे वयोगटात मुलांमध्ये प्रथम क्रमांक आश्रमशाळा, देवळी, द्वितीय क्रमांक राष्ट्रीय विद्यालय, चाळीसगाव, तृतीय क्रमांक के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज, चाळीसगाव. तसेच मुलींमध्ये प्रथम क्रमांक आश्रमशाळा, देवळी, द्वितीय क्रमांक के. आर. कोतकर, ज्युनिअर कॉलेज, चाळीसगाव तर तृतीय क्रमांक राष्ट्रीय विद्यालय, चाळीसगाव येथील संघांनी यश संपादन केले.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वी झालेल्या सर्व संघांचे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कैलासराव सूर्यवंशी यांनी कौतुक केले आहे. क्रीडा स्पर्धेसाठी पंच म्हणून युवराज भोसले, राहुल साळुंखे, पी.पी.पाटील, अक्षय गिरासे, श्री.जगताप, हेमंत गोरे, श्री.साठे, जगदीश चौधरी, निलेश वाघ, स्वप्निल जाधव, राजेश शिरसाठ, एस. एस. गोसावी, एम. ए. पाटील यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक शरद सूर्यवंशी, साहेबराव निकम, संदीप देशमुख तसेच देवळी आश्रमशाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here