Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»एरंडोल»Erandole : एरंडोलमध्ये तलाठ्यांना रंगेहात अटक
    एरंडोल

    Erandole : एरंडोलमध्ये तलाठ्यांना रंगेहात अटक

    saimatBy saimatJanuary 28, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Pachora: Bribery charges against those who demand bribes for grants
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ३० हजार लाचप्रकरणी दोन तलाठ्यांना अटक

    साईमत/एरंडोल/प्रतिनिधी –:

    एरंडोल तालुक्यात महसूल विभागातील दोन तलाठ्यांनी ३० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याचा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे. ही कारवाई रंगेहात पकडण्यात आल्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर संदेश दिला आहे.

    लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्रांतर्गत जळगाव घटकाने ही कारवाई केली. कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १८/२०२६ नोंदविला गेला असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ व १२ अन्वये दोन्ही तलाठ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. आरोपी म्हणून नरेश भास्कर शिरूड (वय ४१), तलाठी सजा उत्राण अहिर हद्द, ता. एरंडोल व शिवाजी एकनाथ घोलप (वय ४६), तलाठी सजा उत्राण गुजर हद्द, ता. एरंडोल यांच्यावर कारवाई करण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा ट्रॅक्टर २७ जानेवारी २०२६ रोजी गिरणा नदीपात्रातून वाळू वाहतूक करताना पकडण्यात आला. पुढील कारवाई न करण्यासाठी आणि ट्रॅक्टर सोडण्यासाठी आरोपी तलाठ्यांनी सुरुवातीला २५ हजार रुपयांची मागणी केली, परंतु पडताळणीदरम्यान ही रक्कम ३० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. आरोपींनी तक्रारदाराला सांगितले, “इतरांकडून जास्त घेतो, तू गरीब आहेस म्हणून तुझ्याकडून ३० हजार घेतो.”

    तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पंचासमक्ष मागणी पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापळा कारवाई राबविण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत आरोपी शिवाजी घोलप यांनी नरेश शिरूड यांच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून ३० हजार रुपये स्वीकारताना एसीबी पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

    सापळा कारवाईदरम्यान नरेश शिरूड यांच्या ताब्यातून १ लाख ७३ हजार ३०० रुपये रोख रक्कम, सुमारे २९५० रुपये किमतीची Paul John कंपनीची ७५० मि.ली. व्हिस्की बाटली (गिफ्ट पॅकमध्ये) व ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला.

    ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या देखरेखीत करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी काम पाहिले, तर पथकात पो.नि. हेमंत नागरे, पो.अं. प्रदीप पोळ, पो.अं. अमोल सूर्यवंशी व पो.अं. सचिन चाटे यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करत आहेत. वरिष्ठ मार्गदर्शन पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांनी केले.

    ही कारवाई महसूल विभागातील भ्रष्टाचाराविरुद्ध एसीबीची निर्णायक पावले असल्याचे स्पष्ट करते, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनी लाच घेण्यास दूर राहावे असा संदेश देण्याचे उद्दिष्ट आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.