साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील टाकळी प्रदे येथे माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिवसाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. वाचनालयाचे चिटणीस डॉ.चंद्रभान गोविंदराव पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून नारळ फोडले. अध्यक्षस्थानी तुषार सूर्यवंशी होते. यावेळी कोषाध्यक्ष संजय पवार, संचालक दत्तात्रय वाणी, अरुण मगर, वाचनालयाचे माजी अध्यक्ष रावसाहेब पवार, योगेश वाणी, गायत्री पाटील उपस्थित होते. तसेच वाचनालयाचे ग्रंथपाल दीपक पवार यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. वाचनालयाच्या लिपिक छाया पाटील यांनी आभार मानले.