टाकळी खुर्दला सत्यशोधक पद्धतीने दशक्रियाचा कार्यक्रम

0
21

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा केला संकल्प

साईमत/जामनेर/प्रतिनिधी

तालुक्यातील टाकळी खुर्दचे माजी सरपंच बाळू हरी चवरे यांची आत्या आणि विजय मगन माळी (सुरत) यांच्या काकू चंद्रकलाबाई अर्जुन माळी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निसर्ग विलीन झाले होते. त्यांचा दशक्रिया व गंधमुक्तीचा कार्यक्रम महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यधर्म म्हणजे सत्यशोधक पद्धतीने एरंडोलचे शिवदास महाजन यांच्या हस्ते नुकताच पार पडला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्ष लागवड करण्यात आली. सत्यशोधक समाजास कार्यास एक हजार १०० रुपये निधी दिला. तसेच टाकळी खुर्दच्या जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमास सत्यशोधक समाजाचे प्रचारक रमेश वराडे, माजी सरपंच सारंगधर अहिरे, अ.भा.माळी समाजाचे अध्यक्ष डॉ.विरेंद्र अहिरे, उपाध्यक्ष राजू जगताप, हेमराज माळी, रमेश चवरे, धनराज माळी, जयेश माळी, डॉ.कृष्णा चवरे यांच्यासह महिला, समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रेरणा सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव डॉ.सुरेश झाल्टे, प्रचारक पवन माळी यांच्याकडून मिळाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here