साईमत/ न्यूज नेटवर्क/मलकापूर :
जुन्या जाणत्या वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन घराघरात ‘वंचित’ कशी पोहोचेल, यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा तर वंचितचे मलकापूर येथील जिल्ह्यातील स्वयंघोषित नेते यांनी लोकसभेत भ्रष्टाचाराचे बी पेरले. त्यामुळे पक्षांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. कोणीतरी पक्षाच्या किंवा कोणाच्यातरी हिताच्या बाजू करून पक्ष विरोधी घटना घडवून आणतात. चुकीची माहिती देऊन पक्षाच्या ध्येय धोरणात दुरावा निर्माण करतात. त्यामुळे पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावलल्या जाते, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोदर यांनी व्यक्त केले.
नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे मलकापूर विधानसभा क्षेत्राच्या चिंतन बैठकप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर ज्येष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद इंगळे, अॅड.सदानंद ब्रह्मणे, यशवंत कळासे, तुळशीराम वाघ, गणेश वानखेडे, अनिल तायडे, प्रल्हाद इंगळे, अनिल धुंदळे, विलास तितरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आगामी निवडणुकीत कोणताही उमेदवार असो तो जनतेच्या विश्वासातला असला पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्र मत बैठकीत व्यक्त केले. यावेळी संजय कटाळे, नितीन दोडे, मिलिंद हिवराळे, उत्तम वाकोडे, अशोक इंगळे, भागवत दाभाडे, सुभाष इंगळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी एल. एफ मेढे, डॉ. जमीर, सुशील इंगळे, विनोद इंगळे, शुभम इंगळे, सुनील इंगळे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पत्रकार सिद्धार्थ तायडे तर आभार भगवान इंगळे यांनी मानले.