माजलगावातील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कडक कारवाई करा

0
17

महाराष्ट्र सुवर्णकार सेना, समस्त सोनार समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे घडलेल्या लहान चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र सुवर्णकार सेना आणि जळगाव शहरातील समस्त सोनार समाजाच्यावतीने गुरुवारी, १० ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या गंभीर घटनेतील दोषींना तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोर शिक्षा व्हावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.निवेदन सादर करण्यासाठी सोनार समाजातील असंख्य कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांनी अशा घृणास्पद घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने निष्णात वकीलाची नेमणूक करावी आणि त्वरित न्याय प्रक्रिया पार पडावी, अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे प्रकरणाचा तपास जलद गतीने करून आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी. तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणीही सुवर्णकार समाजबांधवांनी केली आहे.

यांची होती उपस्थिती

निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष संजय विसपुते, उपाध्यक्ष विजय वानखेडे, सचिव संजय पगार, बबलू बाविस्कर, राजेंद्र दुसाने, संजय टी. दुसाने, मनोज सोनार, प्रशांत विसपुते, गोकुळ सोनार, पंकज विसपुते, राजेश बिरारी, रत्नाकर दुसाने, जगदीश देवरे, अनिल सोनार, लतिका सोनार, रंजना भामरे, इच्छाराम दाभाडे, प्रकाश बाविस्कर, शरद सोनार, उमेश विसपुते, शरद रणधीर, सुरेश सोनार, संदीप सोनार, देविदास सोनार यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here