साईमत, जामनेर : प्रतिनिधी
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जामनेर तालुका मराठी पत्रकार संघ, पत्रकार मंच, ग्रामीण पत्रकार संघ संघटनेच्यावतीने आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना शनिवारी, १२ ऑगस्ट रोजी लेखी निवेदन देण्यात आले.
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना पाचोरा आमदार किशोर पाटील यांनी अश्लील शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना घडली. त्यानंतर संदीप महाजन यांना मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळे अशा प्रकारे पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या आरोपींची चौकशी करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी पत्रकार प्रकाश सैतवाल, लियाकत अली सय्यद, पंढरीनाथ पाटील, सुरेश महाजन, प्रदीप गायके, रवींद्र झाल्टे, किरण सोनवणे, भानुदास चव्हाण, सुनील नेरकर, प्रल्हाद सोनवणे, सुहास चौधरी, अमोल महाजन, मीनल चौधरी, मीना शिंदे, प्रीती कुमावत, संजय सूर्यवंशी, सागर लव्हाळे, राहुल इंगळे, विलास ठाकरे, गजानन तायडे, शांताराम झाल्टे, नितीन इंगळे, मच्छिंद्र इंगळे यांच्यासह पत्रकार संघटनांचे पदाधिकारी तसेच जामनेर तालुका शहर, तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.