न्या. ज्योती दरेकर यांना पीएचडी प्रदान

0
44

साईमत जळगाव प्रतिनिधी

पुणे येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश पदी कार्यरत असलेल्या न्या. ज्योती प्रताप दरेकर यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “पोस्को कायदा २०१२ अंतर्गत लैंगिक गुन्ह्यातील पीडित बालकांचे मानव अधिकार” या कायद्याच्या विषयांमध्ये पीएचडी प्राप्त झाली आहे.

उपरोक्त विषयावरील संशोधनाचा फायदा न्या. ज्योती दरेकर यांना त्यांच्याच न्याय क्षेत्रातील कार्यप्रणालीमध्ये अतिशय उपयोगी ठरणार आहे. मणियार लॉ कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. विजेता सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली न्या. ज्योती दरेकर यांनी पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण केला. कुलगुरू व्ही एल माहेश्वरी यांच्या हस्ते न्या.ज्योती दरेकर यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here