साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याची यवतमाळ येथे विटंबना केली आहे. असे भ्याड आणि नीच कृत्य करणाऱ्या समाज कंटकांचा समता सैनिक दलातर्फे निषेध व्यक्त करुन आंदोलन करण्यात आले.पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज द्रोहींना अटक करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत समता सैनिक दलातर्फे राज्याध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव तहसीलला नुकतेच निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा सचिव नितीन मरसाळे, जिल्हा संपर्क प्रमुख भाईदास गोलाईत, तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव, तालुका उपाध्यक्ष राजू अहिरे, तालुका संपर्क प्रमुख नाना घोडेस्वार, तालुका प्रसिद्धी प्रमुख बाबा पगारे, संघटक शिवाजी शिंदे, तालुका सचिव सचिन गांगुर्डे, सहसचिव विशाल पगारे, संघटक रतन अहिरे, संघटक रवींद्र जाधव, सहसचिव महेंद्र निकम, संघटक सलीम पठाण, संघटक वाहिद पठाण, रामा मोरे, सचिन जगताप, शिवा शहापूरकर, घनशाम बागुल, मंगेश वाघ, अकील शाहा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.