विशाळगड प्रकरणी आरोपींवर कारवाई करा ; एमआयएमचे धरणे प्रदर्शन

0
38

साईमत न्यूज नेटवर्क जळगाव

कोल्हापूर येथे झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येऊन हल्लेखोरांवर युएपीए अंतर्गत कारवाई करा, निष्क्रिय व कर्तव्यात कसूर करणारे प्रशासकीय अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, हल्ल्यामध्ये धार्मिक स्थळ व लोकांची घराचे नुकसान झाले आहे त्यांची नुकसान भरपाई द्या, जे या हल्ल्यात जखमी झाले त्यांना सरकारने प्रत्येकी ५ लाख रुपये द्यावे, मुस्लिम समाजावर होत असलेल्या हल्ल्यासाठी हल्ले थांबवण्यासाठी मुस्लिम समाजासाठी संरक्षण कायदे विशेष अधिवेशन बोलवून पारित करण्यात यावे व या संपूर्ण घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात यावी अशा मागण्या एमआय पक्षातर्फे झालेल्या धरणे आंदोलना मार्फत करण्यात आल्या.

आंदोलन संपल्यावर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाअध्यक्ष अहमद हुसैन, अली अंजूम रजवी, फारुख शेख, अक्रम देशमुख, अरशद शेख, साबीर खान, वासिफ सय्यद, खालिद खाटीक, एरंडोल चे असलम पिंजारी आदींचा समावेश होता.
इम्तियाज जलील यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात १९ जुलै रोजी धरणे प्रदर्शन आयोजित करण्या चे आदेश होते त्यानुसार जळगाव जिल्हा एमआयएमचे जिल्हाअध्यक्ष अहमद हुसेन यांनी धरणे प्रदर्शन चे आयोजन केले होते त्यात हजारोच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती.
यावेळी जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, तांबापुर फाउंडेशनचे आरशत शेख (सोनू) एमआयएमचे महानगराध्यक्ष अक्रम देशमुख, ईश्वर पाटील ( उस तोड संघटना अध्यक्ष) सुनील गायकवाड ( आदिवासी एकता परिषद विभागीय अध्यक्ष) ज्येष्ठ पत्रकार अली अंजुम रजवी यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वीतेसाठी शीबान फाइज, रिजवान शेख, जुबेर शेख, उमर फारुख, हुजैफा शेख, दानिश खाटीक, नदीम शेख आदींनी सहकार्य केले. आंदोलनाचा समारोप मौलाना बाबा शरीफ शाह यांच्या दुवा ने करण्यात आल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here