जामनेरातील ललवाणी महाविद्यालयात मतदान जनजागृतीसाठी ‘ताबुल रसा’ उपक्रम

0
31

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जळगाव यांच्या निर्देशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात मतदान जनजागृती व्हावी तथा मतदारांना मतदानाच्या अधिकाराविषयी त्यांचे मत व्यक्त व्हावे, या उद्देशाने इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘ताबुल रसा’ उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, पर्यवेक्षक प्रा.जी.जी.अत्तरदे, शालेय सांस्कृतिक समितीचे सचिव प्रा.सुमित काबरे, प्रा.माधुरी महाजन, प्रा.सोनुसिंग पाटील उपस्थित होते.

उपक्रमात मतदान जनजागृतीविषयी महाविद्यालयाचे समान संधी केंद्र समन्वयक प्रा.समीर घोडेस्वार यांनी माहिती दिली. कला शाखेतील विद्यार्थ्यांनी ‘वोट फॉर अवर नेशन’, ‘वोटर बेटर इंडिया’, ‘माय वोट माय फ्युचर’, ‘छोड दो अपने सारे काम, पहले चले करे मतदान’ आदी विविध संकल्पनेतून चित्रकला पोस्टर तयार केले. तसेच प्रदर्शन करून मतदानाविषयी जनजागृती केली. यासाठी विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या उपशिक्षिका प्रा.माधुरी तायडे यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वीतेसाठी प्रा.कोमलसिंग परिहार, प्रा.रवींद्र शेले, प्रा.वैशाली पाटील, प्रा.कांचन पाटील, प्रा.विजेता परदेशी, प्रा.रुपाली पाटील, प्रा.धनश्री पाटील, प्रा.पूजा पाटील, प्रा.प्रगती पाटील यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here