साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील स्वयंदीप दिव्यांग महिला संस्था ह्या सामाजिक संस्थेतर्फे रक्षाबंधन निमित्त दिव्यांग महिला भगिनींनी वर्धमान धाडीवाल यांच्यासह पत्रकार मुराद पटेल, गणेश गवळी, रामलाल मिस्तरी, अमन पटेल, समीर शेख यांना संस्थेच्या अध्यक्षा मिनाक्षी निकम, भारती चौधरी, शारदा निकम, निर्मला अगोने, पोळ, करुणा शिंदे, छाया वणकोट, सोनाली मोरे, स्मिता खरे, शालू पाटील, कल्पना चौधरी, रजा पिंजारी, जयश्री कासार यांनी राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या जयश्री वर्धमान धाडीवाल, अंजुम मुराद पटेल ह्या उपस्थित होत्या. आभार संस्थाध्यक्षा मिनाक्षी निकम यांनी मानले.
