साईमत, जळगाव : प्रतिनिधी
पिंप्राळ्यालगतच्या सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात शोभायात्रेसह विविध कार्यक्रम आयोजित केले होते. श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी उद्योजक ललित लढ्ढा आणि तृप्ती लढ्ढा यांच्या हस्ते स्वयंभू महादेव शिवलिंगाचा दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली. यावेळी पितळी कळसाची चंद्रकांत अत्तरदे तर व नंदी देवताची अक्षय अग्रवाल यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच ११ जोडप्यांचा हस्ते हवन पूजा करण्यात आली.
ट्रॅक्टरवर नंदी देवता व पितळी कळस ठेवण्यात आले होते. शोभायात्रा सोनी नगर परिसरात फिरविण्यात आली. शोभायात्रेत परिसरातील कळसधारी महिला ज्येष्ठ नागरिक, वृध्द महिला, युवा मुले, मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनी फुगडी, गरबा, खेळत नाचत आनंद लुटला तर तसेच विनोद लोखंडे, निलेश मिस्तरी, समाधान धनगर, धनराज कुंभार, दिलीप कोळी आदी युवकांकडून प्रसाद म्हणून भाविकांना केळीचे वाटप केले.
प्राणप्रतिष्ठा करून होमहवन पूजा
सोमवारी सकाळी चेतन कपोले महाराज यांच्या उपस्थितीत रुपेश झंवर, चंद्रकांत अत्तरदे, अक्षय अग्रवाल, दिनेश राजपूत, धनराज कुंभार, संजय भोई, नारायण येवले, विजय भावसार, पंकज राजपूत, धनराज कुंभार, गणेश माळी, निलेश जोशी यांच्या हस्ते कळस व नंदी देवताची प्राणप्रतिष्ठा करून होमहवन पूजा करण्यात आली.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी नरेश बागडे , मधुकर ठाकरे, धनराज कुंभार, सरदार पाटील, यशवंत पाटील, देविदास पाटील, धनजंय सोनार, विजय चव्हाण, विनोद निकम, गणेश माळी, दिलीप काशिकर, कैलास कोळी, नारायण येवले, हेमराज गोयर, संजय भोई, भैय्यासाहेब बोरसे, अजय बागडे, राहुल गायधर, निलेश जोशी, विजय भावसार, गणेश जाधव, विकास जागिंड, अमोल पढार, दिलीप कोळी, मणिराम कुंभार, विठ्ठल जाधव, निलेश मिस्तरी, प्रकाश जाधव, लोकेश शर्मा, दिनेश जाधव, संदीप जाधव,
प्रकाश कदम, भगवान माळी, गजानन शिंपी, गोविंदा कदम, राजू पाटील, हेमंत बोरनारे, हेमंत सूर्यवंशी तसेच महिला, युवकांसह चिमुकल्यांनी परिश्रम घेतले.