विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वरदा सानेला चार गटात विजेतेपद

0
28

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

जिल्हा असोसिएशनतर्फे आयोजित विभागीय नाशिक विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत जळगावच्या स्वरदा साने हिने चार गटात विजेतेपद मिळविले तर दक्ष जाधव व भूमिज सावदेकर यांनी दुहेरी मुकुट पटकाविला. ह्या स्पर्धा जळगावातील जिल्हा क्रीडा संघात नुकत्याच पार पडल्या. स्पर्धेत १३० खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेनंतर लगेचच बक्षीस वितरण पार पडले.

विविध गटातील विजयी-उपविजयी खेळाडू असे-११ वर्षं वयोगटात विजयी खूश बगडीया, उपविजयी श्लोक वारके, १३ वर्षं वयोगटात विजयी भूमिज सावदेकर, उपविजयी आरुष जाधव, १५ वर्ष वयोगटात मुली – विजयी स्वरदा साने, उपविजयी स्वाधा भालेकर, नाशिक, मुलांमध्ये विजयी भूमिज सवदेकर, उपविजयी जिनय पिपरिया, १७ वर्षं वयोगटात विजयी स्वरदा साने, उपविजयी स्वाधा वालेकर, मुलांमध्ये विजयी दक्ष जाधव, उपविजयी राजवीर भतवाल धुळे,१९ वर्षं वयोगटात मुली विजयी स्वरदा साने, उपविजयी धुर्वी भानोडिया धुळे, मुलांमध्ये विजयी दक्ष जाधव, उपविजयी जस वेद, महिला गटात विजयी स्वरदा साने, उपविजयी मिश्री कोठारी, पुरुष गटात विजयी पुष्कर टाटीया, उपविजयी जस वेद यांचा समावेश आहे.

यांची होती उपस्थिती

यावेळी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे सचिव यतीन टिपणीस, नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, शिव छत्रपती पुरस्कार्थी डॉ. प्रदीप तळवेलकर, प्रा. चारुदत्त गोखले, शेखर भंडारी, जिल्हा असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी, मनोज अडवाणी, कार्याध्यक्ष प्रकाश चौबे, कोषाध्यक्ष संजय शहा, सचिव विवेक आळवणी, सहसचिव सुनील महाजन, गिरीष कुलकर्णी, राजु खेडकर, कन्हैयालाल संतानी (क्रिष्णा लॅम), हेमंत कोठारी (एस. के. ट्रान्सलाइन), राहुल पवार (डॉक्टर बिर्याणी), हर्षद दोषी (दोषी ऑटोमोबाईल), किरण बच्छाव, संजय जोशी (खान्देश स्पोर्ट्‌स), शैलेश राणे (हॉटेल पथिका) आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी ॲड. विक्रम केसकर, शैलेश जाधव, आयोजन सचिव स्वानंद साने, अमित चौधरी, पुष्कर टाटीया, जश वेद आदींनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here