साईमत, जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा क्रीडा संघातर्फे आयोजित स्व. एल.बी. राजपूत स्मृती प्रित्यर्थ तिसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत स्वरदा साने हिने सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि युथ गर्ल्स गटाचे विजेतेपद मिळविले. या तीन गटात अनुक्रमे आर्या बेहडे, धान्वी पाटील आणि चिन्मयी बाविस्कर हे उपविजयी राहिले. या व्यतिरिक्त मिडजेट मुले विजयी शौर्य पांडे, उपविजयी केशीन गोगया, कॅडेट मुले विजयी श्रीराम केसकर, उपविजयी ज्योतिरादित्य चव्हाण, मुली विजयी मण्मयी थत्ते, उपविजयी धान्वी पाटील, सब ज्युनिअर विजयी प्रेषित पाटील, उपविजयी आरुष जाधव, ज्युनिअर मुले विजयी दक्ष जाधव, उपविजयी भूमिज सावदेकर, युथ मुले विजयी महेश चौधरी, उपविजयी दक्ष जाधव, पुरुष विजयी पुष्कर टाटीया, उपविजयी दक्ष जाधव यांनी विविध गटात प्रथम, द्वितीय स्थान मिळविले. विजेतेपद प्राप्त केले.
ही स्पर्धा जळगाव जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने झाली. विविध १० गटात ११० खेळाडूंनी सहभाग घेतला. बक्षीस वितरण प्रसंगी नवजीवन प्लस सुपर शॉपचे संचालक आकाश कांकरिया, जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे सहसचिव सुनील महाजन, जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे सचिव नितीन अट्रावलकर, कोषाध्यक्ष सचिन गाडगीळ, चंद्रशेखर जाखेटे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शैलेश जाधव, अमित चौधरी, सुभाष गुजराथी, प्रतीक चव्हाण यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ॲड. विक्रम केसकर यांनी केले.