जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवजयंतीनिमित्त ‘स्वराज्य सप्ताह’

0
22

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हा आणि तालुका स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून ‘राज्य रयतेचे-जिजाऊंच्या शिवबाचे’ अंतर्गत १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान ‘स्वराज्य सप्ताह’ आयोजित केला होता. त्यात विविध उपक्रम साजरे केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दिली.

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे ‘स्वराज्य सप्ताह’ साजरा करून महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस जोडला आहे. पक्षाकडून शिवरायांनी स्थापन केलेले रयतेचे राज्य व त्यामधील संकल्पना लोकांसमोर मांडणे, यासाठी शिवराय केंद्रीत विविध उपक्रम राबविण्यात आल्याचेही जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी सांगितले.

स्वराज्य सप्ताहात मुक्ताईनगर येथील परिवर्तन चौक, बोदवड येथील जिजाऊ बालोद्यानात बालशिवाजी आणि जिजाऊ माता स्मारक सभोवताली संपूर्ण परिसर स्वच्छ करून स्वराज्य पताका लावून सुशोभित केले. तसेच बस स्टॅण्ड चौकात स्वराज्य पताका लावून चौकाची सजावट केली. तुकाराम महाराजांची अभंग शतक असलेली तुकाराम गाथा आणि शिवचरित्र वारकऱ्यांना भेट दिली. जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सुशोभिकरण स्वच्छता अभियान, बाईक रॅली, रावेरला बाईक रॅली, स्वच्छता अभियान, चौक सजावट, सावदाला चौक सजावट, यावलला चौक सजावट बाईक रॅली, धानोरा, ता.चोपडा येथे आरोग्य तपासणी, चोपडा येथे कीर्तनाचा कार्यक्रम तसेच गावागावात मुख्य चौकात, स्वराज्य पताका लावून वातावरण निर्मिती केली.

विविध उपक्रम व त्यात सहभागी लोकांचा भुसावळ येथे रयतेचा मेळावा ह्या संकल्पनेखाली ‘शिवरायांचं राज्य हे बहुजनांचं राज्य-रयतेचे राज्य’ ह्या संकल्पनेवर बालशिव व्याख्याते तुषार पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते. ‘जिजाऊंच्या शिवबाचे राज्य रयतेचे’ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित स्वराज्य सप्ताह दरम्यान बाल शिव व्याख्याते तुषार पाटील यांनी यावर व्याख्यान दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया, सामाजिक न्यायाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सपकाळे, विद्यार्थी अल्पसंख्याकाचे शहराध्यक्ष नदीम बागवान, युवक शहराध्यक्ष वसीम शेख, युवक तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, कार्याध्यक्ष निलेश कोलते, जिल्हा पदाधिकारी संजय काकडे यांच्यासह रा.काँ.चे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here