साईमत जळगाव प्रतिनिधी
शासन निर्देशानुसार मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली १४ ते २१ जानेवारी दरम्यान “स्वच्छ तीर्थ अभियान” राबविण्यात आले.या अभ्यानात दिनांक२१ जानेवारी रोजी चिमुकले राम मंदिर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी स्वतः झाडू हातात घेऊन व धार्मिक स्थळाचा परिसर पाण्याने स्वच्छ धुऊन स्वच्छता अभियानात अग्रेसर भूमिका घेतली तसेच यावेळी सह. आयुक्त उदय पाटील, सर्व मुख्य स्वच्छता निरीक्षक व आरोग्य निरीक्षक, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
“स्वच्छ तीर्थ” अभियानांतर्गत शहरातील ९७ धार्मिक स्थळांची स्वच्छता महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील नामांकित, राजकीय, समाजसेवक, धार्मिक संस्था, शासकीय अधिकारी व कर्मचारी, सामाजिक संस्था या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. या मोहिमेचा मुख्य उद्देश शहराची व शहरातील विवध धार्मिक स्थळांची स्वच्छता करून नागरिकांना शहर स्वच्छ ठेवणे ही फक्त शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाच्या जबाबदारी आहे. यासाठी प्रोत्साहित करणे हा होता.
यावेळी आयुक्त विद्या गायकवाड यांनी शहरातील नागरिक पुढेही महानगरपालिकेला शहरातील स्वच्छता अबाधित ठेवण्यात असेच सहकार्य करतील व स्वच्छतेचे महत्व जाणतील अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रसंगी अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, राम मंदिर प्रतिष्ठानचे पुजारी उपस्थित होते.
