जळगाव ः प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्स वं सावरिया फ्युचर वर्क्स लि.च्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरातील अंत्यविधी वेळी येणारी अडचण पाहून जनतेच्या सेवेसाठी एक नवीन सुसज्ज असलेला स्वर्गरथ लोकार्पण सोहळा काल रोजी रोटरी हॉल, गणपती नगर येथे झाला .
लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, महापौर जयश्रीताई महाजन,रमण अग्रवाल,माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, उपमहापौर कुलभूषण पाटील, नंदु अडवानी,सहाय्यक प्रांतपाल डॉ.मुर्तझा अमरेलीवाला, माजी अध्यक्ष नीरज अग्रवाल, विद्यमान अध्यक्ष जिनल जैन, मानद सचिव चेतन सोनी, विपुल पटेल, माजी अध्यक्ष सागर मुंदडा, धनराज कासट, योगेश कलंत्री,धर्मेश गादिया, नरेश मंधान, हर्षल कटारिया,चिराग शाह, योगेश साखला, गणेश सुर्यवंशी, करण ललवाणी, स्वरूप मल्हारा, जिगर पटेल, गोविंद तापडिया,राहुल कुकरेजा, निशीत कुकरेजा,सरिता झवर, स्नेहल काबरा आदी उपस्थित होते.
या सेवेच्या संपर्कासाठी निमित कोठारी, योगेश कलंत्री,धनराज कासट,सावरिया,सुशील दोशी यांच्याशी संपर्क साधावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष सागर मुंदडा यांनी केले तर आभार विद्यमान अध्यक्ष जिनल जैन यांनी मानले.
रमण अग्रवाल यांचे दातृत्व
या स्तुत्य उपक्रमास येथील उद्योगपती व सावरिया फ्युचर वर्क्सचे संचालक व्यवस्थापक रमण अग्रवाल यांचे आर्थिक सहकार्य लाभले.त्यांच्यासमोर या प्रकल्पाची मांडणी करण्यात आली असता त्यांनी तात्काळ सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.त्यांना सामाजिक कार्याची आवड असून आपले समाजासाठी काही देणं लागतं ही भावना त्यांच्यात नेहमी दिसून येते. ते रोटरी स्टारचे पदाधिकारीसुद्धा असून त्यामाध्ममातूनही त्यांचे समाजकार्य सुरुच असते.या प्रकल्पाच्या पूर्तीसाठी त्यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे.त्यासाठी जळगाव रोटरी क्लब ऑफ स्टार्सचे अध्यक्ष जिनल जैन व सर्व पदाधिकायांनीही परिश्रम घेतले.