तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आडगाव शाळेचे सुयश

0
13

साईमत, कासोदा, ता. एरंडोल : वार्ताहर

येथील धनराज खंडेराव पाटील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत विविध खेळात सुयश मिळविले आहे. स्पर्धेत १४ वर्षाआतील १०० मीटर धावणेत गोपाल भाऊसाहेब महाजन प्रथम, १७ वर्षाआतील १०० मीटर धावणेत सुनील अनिल पाटील प्रथम, २०० मीटर धावणेत चेतन शांताराम महाजन प्रथम, गोळाफेकमध्ये प्रशांत शिवाजी महाजन प्रथम, थाळीफेकमध्ये चेतन शांताराम महाजन प्रथम, लांब उडीत सनी सोमनाथ पाटील प्रथम अशा विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सुयश मिळवून त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. त्यांना क्रीडा विभाग प्रमुख एस.टी.पाटील, पी.जी.कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निवडीबदल शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला. सर्वच प्रकारात विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष शालीग्राम पाटील, संचालक मंडळासह शिक्षक, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here