गो.से.हायस्कुलच्या विद्यार्थ्यांच्या ‘सुवर्णयुग माझ्या शिवबाचे’ महानाट्याने मने जिंकली

0
32

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

येथील श्री.गो.से.हायस्कुलमधील विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त सादर केलेले ‘सुवर्णयुग माझ्या शिवबाचे’ महानाट्य रसिकांच्या मनावर राज्य करणारे ठरले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनय, वेशभूषा आणि ऐतिहासिक प्रसंगांचे चित्रण यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मंगळवारी सायंकाळी श्री.गो.से.हायस्कुलच्या प्रांगणात पीटीसी संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या संकल्पनेतून महेश कोंडीण्य लिखित आणि दिग्दर्शित ‘सुवर्णयुग माझ्या शिवबाचे’ महानाट्याचा प्रयोग आयोजित केला होता. माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून महानाट्याचे उद्घाटन झाले.

याप्रसंगी संजय वाघ, व्ही.टी.जोशी, दगाजी वाघ, खलील देशमुख, भडगावचे माजी नगराध्यक्ष श्‍यामकांत भोसले, प्रा.भागवत महालपुरे, जिजाबाई पाटील, अभिमन्यू पाटील, शशिकांत चंदिले, मधुकर पाटील, सतीश चौधरी, प्रकाश पाटील, योगेश पाटील, किशोर डोंगरे, विश्‍वासराव साळुंखे, सुधीर पाटील, वासुदेव महाजन, नितीन तावडे, प्राचार्य डॉ.शिरीष पाटील, डॉ.एन.एन.गायकवाड, डॉ.बी.एन.पाटील, डॉ.वासुदेव वले, डॉ.जे.व्ही.पाटील, दत्ता बोरसे, भूषण वाघ, सुरज वाघ, गौरव वाघ, आकाश वाघ, सुचेता वाघ, ज्योती वाघ, मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, नरेंद्र ठाकरे, आर.एल.पाटील, अंजली गोहिल आदी उपस्थित होते. महानाट्यात गो.से.हायस्कूलमधील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या १७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दोन तास चाललेल्या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक महत्त्वाचे प्रसंग सादर केले.

विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा जन्म, शिक्षण, युद्धनीती, पावनखिंड, तानाजी मालुसरे, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावर हल्ला, स्वराज्य स्थापना आणि राज्याभिषेक यासारख्या अनेक प्रसंगांचे उत्कृष्ट चित्रण केले. त्यात प्रामुख्याने विद्यार्थी कलावंतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरची महाराष्ट्रातील स्थिती, आदिलशाही कुतुबशाही व मुस्लिम राज्यकर्त्यांची आंदोलने, ब्रिटिशांची गुलामगिरी, शहाजीराजांची सरदारकी, महाराष्ट्रातील जनतेवर वाढणारे अन्याय अत्याचार, शिवाजी महाराजांचा जन्म, शिवाजी महाराजांना जिजाऊ व सरदारांकडून मिळालेले शिक्षण, युद्धनीती, पावनखिंडीचा बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम, तानाजी मालुसरे यांनी घेतलेला कोंडाणा किल्ला, बडी बेगम साहेबांच्या दरबारात अफजलखानाने शिवाजी राजांना ठार करण्याचा उचललेला विडा, शाहिस्तेखानावरील हल्ला, शिवरायांनी जिंकलेले किल्ले, प्रतापगडावरील अफजलखानाचा वध यासह महिला, तरूण, शेती व शेतकरी यांच्या संरक्षणार्थ शिवरायांनी राबविलेली ध्येयधोरणे, हिंदवी स्वराज्याची स्थापना व शिवरायांचा अत्यंत नयनरम्य असा राज्याभिषेक सोहळा असे अनेक प्रसंग कसदार अभिनयातून विद्यार्थ्यांनी साकारले.

उत्कृष्ट वेशभूषा, दिव्यांची रंगसंगती, फटाक्यांची आतषबाजी, भगवे झेंडे आणि फेटे, प्रसंगानुरूप ध्वनी आणि पोवाड्याच्या माध्यमातून सादर केलेले महानाट्य गो.से.हायस्कुलच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम केल्यामुळे प्रेक्षकांना आवडले. याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. सोबतच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि जयघोष करून विद्यार्थी कलाकारांचा उत्साह वाढविला. प्रास्ताविक संजय वाघ, सूत्रसंचालन अजय अहिरे, आर.बी. बोरसे तर महेश कौडीण्य यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here