Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»चारित्र्याचा संशय भोवला : दोन्ही चिमुकल्यांना कुऱ्हाडीने संपविले
    क्राईम

    चारित्र्याचा संशय भोवला : दोन्ही चिमुकल्यांना कुऱ्हाडीने संपविले

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 27, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पत्नीच्या डोक्यावरही कुऱ्हाडीने वार, धुळ्यात पत्नीवर उपचार सुरू

    साईमत/चोपडा/प्रतिनिधी :

    तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पट्ट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी संजय नानसिंग पावरा (वय २३) याने स्वतःच्या पोटाच्या दोन चिमुकल्या आणि निरागस बालकांवर कुऱ्हाडीने वार करून ठार केले आहे. तसेच पत्नी भारती संजय पावरा हिच्यावर चारित्र्याचा संशयाने क्रूर प्रकार संजय पावरा याने केला आहे.

    सविस्तर असे की, चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथे पती संजय नानसिंग पावरा आणि पत्नी भारती संजय पावरा(वय १९) हे पाच वर्षाचा मुलगा डेव्हिड संजय पावरा आणि तीन वर्षाची मुलगी डिंपल संजय पावरा यांच्यासह वास्तव्यास होते. परंतु संजयला पत्नी भारतीच्या चारित्र्याबाबत संशय आला आणि १८ रोजी पती-पत्नी दोघांमध्ये घरात भांडण सुरू झाले. त्यानंतर दररोज घरात भांडण सुरू होते. भारती ही चिमुकल्या मुलगी डिंपलसह भांडणाला कंटाळून मध्य प्रदेशच्या सीमेलगतच्या आत्याच्या गावी रांजणगाव (मध्य प्रदेश) येथे निघून गेली. तिथे गेल्याचे समजल्यानंतर संजयचे आई-वडीलही तिथे गेले आणि भारतीला उलट सुलट बोलू लागले. हे भारतीच्या माहेरच्या नातेवाईकांना माहिती पडले. नातेवाईक तिला तिच्या माहेरी देवली येथे घेऊन गेले. देवली (मध्यप्रदेश) येथे माहेर असलेली भारती ही मुलगी डिंपल (वय ३) गेली असल्याचे माहिती पडल्यानंतर आरोपी व पती संजय हा मुलगा डेविड संजय पावरा (वय ५) याला घेवून त्याच्या सासरवाडी असलेल्या देवली येथे २२ रोजी गेला.

    म.प्र.मधील वरला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

    जिथे पत्नी राहत होती, त्याच्या आजूबाजूला २२ रोजी त्याने कुऱ्हाडीचा व लोखंडी सळईचा शोध घेऊन ठेवला. २३ रोजी सकाळी पत्नी भारतीसोबत भांडण केले. त्यात त्याने कुऱ्हाडीचा एकेक घाव घालून दोन्ही मुलांचा जागीच निर्घृण खून केला. त्यानंतर पत्नी भारतीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने पाच ते सहा वार केले. भारतीने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक धावत आले. हे कृत्य पाहून त्यांनी आरोपीला पकडून ठेवले. पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याने लोखंडी सळईनेही भारतीला मारहाण केली होती. ही घटना मध्य प्रदेशमधील वरला पोलीस स्टेशन अंतर्गत घडल्याने वरला पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला तिथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    जनमानसातून व्यक्त होतोय संताप

    कुऱ्हाडीच्या वारमध्ये पत्नी भारतीच्या डोक्याला जबर जखम झाली आहे. मेंदूपर्यंत मार लागला असल्याने तिच्या मेंदूवर धुळे येथील शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली आहे. त्याठिकाणी ती मृत्यूशी झुंज देत आहे. स्वतःच्या पोटच्या दोन निरागस मुलांचा निर्घृण खून केल्याने संजय नानासिंग पावरात असलेल्या क्रुरतेचा निषेध होऊन जनमानसातून संताप व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.