साईमत, नवीदिल्ली ः वृत्तसंस्था
संसदीय कामकाजात व्यत्यय आणल्याच्या आणि देशाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना तीन आठवड्यांपूर्वी लोकसभेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण लोकसभेच्या विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले होते. विशेषाधिकार समिती याप्रकरणी निर्णय घेईपर्यंत चौधरी निलंबित राहतील असे त्याव्ोळी सांगण्यात आले होते. दरम्यान, लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन रद्द केले आहे. हे निलंबन मागे घेण्याची शिफारस करणारा ठराव विशेषाधिकार समितीने मंजूर केला आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
संसदीय कामकाज मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते प्रल्हाद जोशी यांनी १० ऑगस्ट रोजी संसदेच्या पावसाळी अधिव्ोशनादरम्यान अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला होता, जो त्याच दिवशी संसदेत मान्य करण्यात आला होता परंतु चौधरी यांचे निलंबन आता मागे घेण्यात आले आहे. भाजपा खासदार सुनील कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर अधीर रंजन चौधरी म्हणाले, मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. मी माझ्या वक्तव्याप्रकरणी खेद व्यक्त करतो.