बंद कंपन्यांमधील चोरीचा पोलिसांनी लावला यशस्वी छडा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील एमआयडीसीच्या हद्दीतील व्ही. सेक्टरमध्ये बंद असलेल्या कंपनीतून तांब्याच्या तारेचे रीळ, इलेक्ट्रिक वायरचे बंडल असा ४८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. दाखल गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी याबाबत तपास करून बंद कंपन्यांमधील चोरीचा छडा लावण्यात पोलिसांनी यश मिळाले आहे. याप्रकरणी केवळ ४ तासात एका संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
गौरी पॉलीमर्स या बंद कंपनीतून चटई बनविण्याच्या मशीनचे २५ हजार रुपये किमतीचे नवे-जुने स्पेअर पार्ट असा ४८ हजार ६०० किमतीचे चोरी झाल्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याबाबत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकास गुन्हा उघड करण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पीएसआय राहुल तायडे यांनी गुन्हा घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपास करण्याकामी पो.हे.काॅ. गणेश शिरसाळे, रामकृष्ण पाटील, पो.कॉ. राहुल रगडे, विशाल कोळी, गणेश ठाकरे, राहुल घेटे, नितीन ठाकुर असे पथक तयार केले होते.
पथकातील अंमलदारांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व नेत्रम कार्यालय येथील कॅमेरे तपासल्यावर दोन अज्ञात महिला व्ही सेक्टरमधील बंद पडलेल्या कंपनीत वरील वर्णनाचा सामान गोणीत भरुन चोरी करतांना आढळून आल्या. तसेच घटनास्थळावरील आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासल्यावर महिला ह्या चोरी केलेल्या सामानाच्या गोण्या त्यांच्या साथीदारांनी आणलेल्या रिक्षात भरुन घेऊन जातांना दिसून आले. त्यानुसार रिक्षाचा नंबर निष्पन्न करुन व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा अज्ञाताचे नाव निष्पन्न करुन त्यास चोरी गेलेल्या मालासह व माल वाहून नेण्याकामी वापरलेल्या मालवाहू रिक्षासह ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्याचे नाव इमरान खान सलीम खान भीस्ती उर्फ रेपट्या (रा. शाहु नगर, जळगाव) असे आहे. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सुचनाप्रमाणे पी.एस.आय. राहुल तायडे, पो.हे.कॉ. गणेश शिरसाळे, रामकृष्ण पाटील, पो.काॅ. राहुल रगडे, विशाल कोळी, गणेश ठाकरे, राहुल घेटे, नितीन ठाकुर यांनी केली आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्याकामी नेत्रमचे पोलीस अंमलदार पो.कॉ. पंकज खडसे, मुबारक देशमुख यांनी सहकार्य केले. तपास पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, पो.कॉ. नरेंद्र मोरे करीत आहे.
