कोळी महादेव जमातीच्या आमरण उपोषणाला ‘वंचित’चा पाठिंबा

0
59

प्रशासनाच्या विरोधात आदिवासी जमातीत पसरला असंतोष

साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :

उपविभागीय अधिकाऱ्यांंच्या कार्यक्षेत्रातील मलकापूर, नांदुरा, मोताळा तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे गेल्या १३ ऑगस्टपासून बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यात कोळी महादेव जमातीचे ज्ञानेश्वर काशिराम खवले, मनोहर भोलाणकर, सूरज तायडे आणि संदीप सपकाळ यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे. उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोदर यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

आदिवासी कोळी महादेव जमातीला भारतीय राज्यघटनेचे कलम ३४२ नुसार अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात आलेले आहे. तरीही उपविभागीय अधिकारी हे आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे या जमातीमधील विद्यार्थी, बेरोजगार, शेतकरी, मजूर यांना शासनाच्या विविध योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे अडीअडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात आदिवासी जमातीमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आदिवासी कोळी महादेव जमातीला जाणीवपूर्वक डावलण्यात येत आहे असे उपोषणकर्ते यांनी निवेदनात म्हटले आहे.

यांची होती उपस्थिती

शासन व प्रशासन यांचा निषेध म्हणून आदिवासी कोळी महादेव जमातीच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी भागवत गवळी, गणेश इंगळे, रोहिणी इंगळे, गजानन धाडे, पत्रकार मनोज पाटील, वासुदेव सोनवणे, शुभम घुळे, मंगेश न्हावकर, उमेश धाडे, संदीप धाडे, श्रीकृष्ण धाडे, निना शिरसाट, भूषण धाडे, दत्ता सुरळकर यांच्यासह मलकापूर, नांदुरा, मोताळा तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here