स्मृतीप्रित्यर्थ वृक्षांची केली लागवड, समाजबांधवांची लाभली उपस्थिती
साईमत/जामनेर/प्रतिनिधी
येथील रहिवासी किरण व अनिल माळी यांचे वडील आणि सत्यशोधक समाजाचे प्रचारक रमेश वराडे यांचे मामा छगन रामदास पाटील यांचे अल्पशा आजाराने २४ नोव्हेंबर रोजी निसर्ग विलीन झाले होते. त्यांचा दशक्रिया विधी व गंध मुक्ती विधीचा कार्यक्रम महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यधर्म म्हणजे सत्यशोधक पद्धतीने विधीकर्ते शिवदास महाजन, एरंडोल यांच्या हस्ते नुकताच झाला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्ष लागवड करण्यात आली.
कार्यक्रमास सत्यशोधक समाजाचे प्रचारक रमेश वराडे, पवन माळी, कैलास महाजन, वासुदेव माळी, मोहन चौधरी, बाबुराव पाटील, सुभाष पाटील यांच्यासह समाज बांधव, नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रेरणा सत्यशोधक समाज संघाकडून मिळाली.