मुक्ताईनगर : प्रतिनिधी
परदेशातील शिक्षणाकरीता ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्याकडून मुक्ताईनगर येथील रहिवासी सनी निलेश बढे यांना एक लाखाचा धनादेश नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. सध्या बढे हा विद्यार्थी बारामतीतील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी महाविद्यालय येथे ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट येथे शिक्षण घेत आहे. जे नेदरलँड्समधील व्हॅन हॉल लॅरेन्स्टाईन विद्यापीठाशी संलग्नित आहे. पुढील दोन वर्षाच्या शिक्षणाकरीता तो रविवारी, २० ऑगस्ट रोजी नेदरलँडला रवाना होत आहे. सनीचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला असून त्याच्या कुटुंबीयांना शेतीची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे.
सनीचे आजोबा नेहमी शेती कामात व्यस्त असायचे. त्याला शेतात घेऊन जायचे. त्यामुळे त्याला कृषी शिक्षणाची आवड निर्माण झाली. तो लहान असताना त्याच्या वडिलांना रोपवाटिका व्यवसाय सांभाळताना पाहिले आहे. ज्यामुळे कृषी निविष्ठांमध्ये आवड निर्माण झाली. त्याच्या पालकांनी त्याला दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन क्षेत्रातही दाखविले. ज्याने त्याच्यात चमक निर्माण करण्यासाठी मदत झाली.
यांची होती उपस्थिती
सनीची उच्च शिक्षणासाठी नेदरलँड येथे निवड झाल्याबद्दल मुक्ताईनगर येथील ‘हॅप्पी माईंड’ फाउंडेशनच्यावतीने अध्यक्ष डॉ.तेजांशु सरोदे यांनी सनी बढे याचा सत्कार केला. यावेळी फाउंडेशनचे सचिव डॉ.प्रणिता सरोदे, उपाध्यक्ष प्रा.छाया खर्चे, ‘मुक्ताई’ लॅबचे डॉ.सोपान पाटील, शहरातील डॉ.शुभम खर्चे, डॉ.मयुरी खर्चे, डॉ.गोरे, डॉ.इंद्रायणी निलेश बढे ह्या उपस्थित होत्या.