घोडगावच्या सुनबाई गायत्री बाविस्कर यांची मुद्रा, जलसंधारण विभागात निवड

0
8

घोडगावच्या सुनबाई गायत्री बाविस्कर यांची
मुद्रा, जलसंधारण विभागात निवड

साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी

चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील रहिवासी तथा सध्या नाशिक येथे स्थायिक झालेले सुनील बारकू पाटील यांची सुन तसेच अमोल सुनील पाटील (बाविस्कर) यांच्या पत्नी गायत्री अमोल पाटील (बाविस्कर) यांनी महाराष्ट्र शासनाच्या २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या सरळ सेवा पदभरती अंतर्गत मृदा व जलसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ‘ब’ (अराजपत्रित अधिकारी) या पदासाठी घवघवीत यश संपादन केले असून त्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे.

त्यांनी घोडगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गायत्री पाटील यांच्या यशाबद्दल प्रकाश रजाळे, संचालक संजय पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, सोसायटीचे संचालक सुनील पाटील, रवींद्र पाटील, किशोर पाटील, मिलिंद पाटील यांनी अभिनंदन करुन कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here