राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमानी सभेची जय्यत तयारी

0
10

साईमत जळगाव प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जिल्हा दौऱ्यावर येत असून सागर पार्क मैदानावर त्यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेच्या तयारीची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे,माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणीताई खडसे, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांची जळगावातील सागर पार्क मैदानावर भव्य अशी जाहीर सभा होणार आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कडून जोरदार तयारी केली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज सागर पार्क मैदानावर शरद पवार यांच्या जाहीर सभेच्या तयारीसाठी उभारण्यात येत असलेल्या सभामंडपासह तयारीची पाहणी केली. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सुरू असलेल्या तयारीची माहिती घेतली. तसेच तयारीबाबत आवश्यकता सूचनाही यावे आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here