चाळीसगावला विधानसभा मतदानासाठी प्रशासनाची जय्यत तयारी

0
2

मतदानासाठी ३४४ केंद्रांची उभारणी, मतदान यंत्राचे वाटप

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात बुधवारी, २० रोजी होऊ घातलेल्या मतदानासाठी प्रशसानातर्फे जय्यती तयारी केली आहे. मतदानासाठी शहरी भागात ७५, ग्रामीण भागात २६९ अशा ३४४ मतदान केंद्राची स्थापन केली आहे तर मतदानासाठी ४४७ व्हीव्हीपॅट मतदान यंत्र केंद्रावर १८ रोजी रवाना केल्याची माहिती पत्रपरिषदेत प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले यांनी दिली. नवीन प्रशासकीय इमारतीत १८ रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास आधिकारी नंदकुमार वाळेकर, मुख्याधिकारी कौस्तुभ जोशी, नायब तहसीलदार डॉ. संदेश निकुंभ आदी उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले म्हणाले की, या निवडणुकीत ११ आदर्श मतदान केंद्र राहणार आहे. त्यापैकी तीन मतदान केंद्र महिला अधिकारी यांच्याद्वारे संचलित, दोन मतदान केंद्र दिव्यांग अधिकारी यांच्याद्वारे संचलित आणि एक मतदान केंद्र युवा अधिकारी यांच्याकडून संचलित राहणार आहेत. जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी आकर्षित करण्याकरिता आदर्श मतदान केंद्र योजना राबविण्यात येत आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक, सेक्टर अधिकारी यांच्यामार्फत तसेच स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी यांनी संपूर्ण ३४४ मतदान केंद्रांना भेटी दिलेल्या आहे. तेथे उपलब्ध असलेल्या किमान आवश्यक सुविधांचा आढावा घेतलेला आहे.

मतदानासाठी ४४७ मतदान यंत्राचे वाटप करण्यात आले. त्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे वाटपासाठी ३४ टेबलावर नियोजन केले होते. एक टेबलावर वाटपासाठी १० मतदान केंद्र याप्रमाणे होते तर २३ रोजी याच इमारतीत मतमोजणी होणार आहे. त्यासाठी २५ टेबल नियोजित केले आहे. मतदार संघात ३४४ मतदान केंद्रापैकी १७० वेबकास्टींगद्वारे मतदारांवर नजर ठेवण्यात येणार आहे तर ३६ ठिकाणी सुक्ष्म निरीक्षकद्वारे नियंत्रण ठेवण्यात आले असल्याची माहिती प्रातांधिकारी प्रमोद हिले यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here