साईमत मलकापूर प्रतिनिधी
छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत जि.प.म.उ.प्रा.शाळा, मोमीनाबादची विद्यार्थिनी सुरेखा वाघोदे हिने तालुक्यातून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
छत्रपती शाहू महाराज ह्यांचे शैक्षणिक कार्य ह्या विषयावर नांदुरा तालुक्यातून प्राप्त निबंधांमधून सुरेखा वाघोदे ला तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून मोठ्या प्रमाणात तिचे कौतुक होत आहे. रोख स्वरूपाचे बक्षीस तिच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
यासाठी तिला शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम राणे, रामेश्वर तायडे, सुधीर भंगाळे, सुरेश तायडे यांचे मार्गदर्शन मिळाले. याबद्दल तिचे गावचे उपसरपंच महेंद्र गवई , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रावण दांडगे तसेच गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.