साईमत, चोपडा : प्रतिनिधी
येथील प्रताप विद्या मंदिराच्या मुलींच्या संघाने विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत झेंडा रोवला आहे. कळवण येथे नुकत्याच पार पडलेल्या नाशिक विभागीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत प्रताप विद्या मंदिराच्या १९ वर्षाआतील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावून भरीव कामगिरी केली. प्रथम फेरीत नंदुरबार संघासोबत झालेल्या सामन्यात २-० ने बाजी मारली तर नाशिक संघासमवेत २-० ने आघाडी घेत तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष, संचालक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आदींनी तसेच सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.