‘थ्री ऑन थ्री’ बास्केटबॉल स्पर्धेत पाचोरा संघाचे यश

0
73

प्रथम, द्वितीय, तृतीय विजयी संघांना दिल्या सन्मान ट्रॉफी

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद जळगाव, क्रीडा भारती जळगाव, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव आणि जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त राष्ट्रीय दिन क्रीडा सप्ताहातील १९ वर्षाच्याआतील मुले व मुली आणि १९ वर्षावरील पुरुष व महिला ‘थ्री ऑन थ्री’ बास्केटबॉल स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलातील बास्केट बॉल मैदानावर नुकत्याच घेण्यात आल्या. १९ वर्षांवरील बास्केटबॉल स्पर्धेत पाचोरा बास्केटबॉल ग्रुप विजेता तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ उपविजेता, युनिटी बास्केटबॉल क्लब, पाचोरा तृतीय स्थानी विजयी झाले.

प्रथम, द्वितीय, तृतीय विजयी संघांना जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्रीडा अधिकारी श्रीमती सुजाता गुल्हाने, युवा क्रीडा शिक्षक व शारीरिक शिक्षण महासंघाचे सचिव प्रा. हरीश शेळके यांच्या हस्ते सन्मान ट्रॉफी देण्यात आल्या. याप्रसंगी मास्टर माईंड अकॅडमीचे अभिजित खाचने, श्रीकृष्ण जलपान सेंटरचे संचालक आशिष पाटील, जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे प्रभारी साचिव जितेंद्र शिंदे उपस्थित होते.

पाचोरा विजयी संघाच्या खेळाडूंना प्रशिक्षक आबा पाटील, विकास सूर्यवंशी, गिरीश पाटील, जावेद शेख, भावेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल पाचोरा संघांचे क्रीडा क्षेत्रात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here