तालुकास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत गोपीचंद पुना पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे यश

0
27

साईमत, भडगाव : प्रतिनिधी

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलीत गोपीचंद पुना पाटील, कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव, ता.भडगाव येथील खेळाडूंनी जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय आणि भडगाव तालुका क्रीडा समितीतर्फे आयोजित तालुकास्तरीय १७ तसेच १९ वर्षाआतील तालुकास्तरीय शालेय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात विजयी, उपविजयी होत महाविद्यालयास यश केले आहे. त्यामुळे त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेच्या सविस्तर निकालातील यशस्वी खेळाडूंमध्ये १७ वर्षाच्या आतील मुलांमध्ये जयदीप कैलास सोनवणे (१०० मी.प्रथम), मिलिंद संजय पाटील (१५०० मी.प्रथम), १७ वर्षाच्या आतील मुलींमध्ये नंदिनी सूर्यवंशी (३ कि.मी.चालणे), १९ वर्षाच्या आतील मुलांमध्ये रोहन राजेंद्र राजपूत (लांबउडी, प्रथम व १०० मी.द्वितीय), गोपाल प्रवीण पाटील (१५०० मी.प्रथम), १९ वर्षाच्या आतील मुलींमध्ये पायल कैलास सोनवणे (१०० मी. व ४०० मी.प्रथम), भाग्यश्री भगवान पाटील (१५०० मी.प्रथम, ८०० मी.द्वितीय) यांचा समावेश आहे.

स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना कार्यवाहक रघुनाथ पाटील, आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे, राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या यशाबद्दल अनेकांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here