तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत गो.से.हायस्कूलचे यश

0
45

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

येथील एसएसएमएम महाविद्यालयात १७ वर्षाखालील वयोगटासाठी नुकत्याच तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात गो.से. हायस्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यात गुरुशरण जगदीश सोमवंशी आणि अमानत वाजीद बागवान यांचा समावेश आहे. त्यांना एल.टी. पाटील, डी. डी. कुमावत यांचे मार्गदर्शन लाभले.

याबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ. चेअरमन संजय वाघ, व्हा.चेअरमन व्ही. टी. जोशी, मानद सचिव महेश देशमुख, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन, मुख्याध्यापिका वाघ, उप मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, ए.बी. अहिरे, श्रीमती गोहिल तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here