घरकुलाच्या लाभार्थ्यांना त्वरित अनुदान द्यावे

0
10

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

बेघर असलेल्यांसाठी घरकुल आवास योजनेच्या शहरी भागात नगर परिषदेच्या माध्यमातून लाभ देण्यात येतो. मात्र, अनेक गरजू आणि पात्र असलेले लाभार्थी अद्यापही लाभापासून वंचित आहे. घरकुलाचा लाभ मिळालेल्यांना शासनाच्यावतीने घरकुलासाठी देण्यात येणारे अनुदान प्राप्त न झाल्याने तो त्यांना त्वरित देण्यात यावा, अशी मागणी प्रहार जनशक्तीचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणाचे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून करण्यात आली. अशा आशयाचे निवेदनही त्यांना नुकतेच देण्यात आले.

शासनाच्यावतीने बेघर असलेल्यांकरीता घरकुल आवास योजनेच्या शहरी भागात नगर परिषदेच्या माध्यमातून लाभ देण्यात येतो. मात्र, लाभापासून अनेक गरजू व पात्र असलेले लाभार्थी वंचित आहे. ज्यांचे घरकुल मंजूर झालेल आहेत. त्यांना देण्यात आलेल्या शासनाच्या अनुदानाचा लाभ हा मिळालेला नाही तर काहींना पहिला टप्पा मिळाला, काहींना दुसरा तर काहींना अद्याप एकही टप्पा मिळालेला नाही.

अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचा लाभ मिळाल्यानंतर उसनवारीचे पैसे घेऊन घरकुलाचे काम केले आहे. मात्र, शासनाच्यावतीने मिळणारे अनुदानाचे हप्ते रखडल्यामुळे उसनवारी घेतलेले पैसे फेडावे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. काहींनी घरकुल बांधावयास काढले असून भाड्याच्या घरात राहत असल्याने त्यांनाही नाहक भाड्याचा भूर्दंड सहन करावा लागत आहे.

घरकुल धारकांना न्याय मिळवून द्यावा

मलकापूर न.प.च्यावतीने पात्र लाभधारकांना घरकुलापासून वंचित ठेवण्याचा प्रकार करण्याबरोबरच ज्यांचे घरकुल मंजूर झालेले आहे. त्यांना सुध्दा घरकुलाच्या लाभाचे हप्ते वेळेवर मिळत नसल्याने घरकुल लाभार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. घरकुलाच्या प्रश्नी योग्य ती चौकशी करून घरकुल धारकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर प्रहार जनशक्तीचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्यासह बलराम बावस्कार, अजित फुंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here