विद्यार्थ्यांनी ‘शिवचरित्रातून’ प्रेरणा घेऊन ध्येय निश्‍चित करावे

0
35

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांनी ‘शिवचरित्रातून’ प्रेरणा घेऊन जीवनाचे ध्येय निश्‍चित करावे, असे प्रतिपादन शिवचरित्राचे अभ्यासक तथा प्रचारक ह. भ. प. संजीव सोनवणे यांनी केले. तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजयंती उत्सवांतर्गत शिवचरित्र व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शिवचरित्रातील विविध प्रसंग आपल्या ओघवत्या वाणीतून जसेच्या तसे विद्यार्थ्यांसमोर उभे केले. त्यात महाराजांच्या प्रतापगडावरील पराक्रमाचे सुंदर शब्दचित्रण केले. यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांसह शिक्षक प्रसंगातून प्रेरित झाले.

यावेळी व्याख्याते ह.भ.प. संजीव सोनवणे यांचे शाळेचे मुख्याध्यापक आर.पी. चौधरी यांनी स्वागत केले. यावेळी चहार्डी गटाचे केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे, जि. प. वेले शाळेचे मुख्याध्यापक बापू बहारे, पर्यवेक्षक व्ही. ए. नागपुरे, आर. एम. चौधरी, एस. पी. बिऱ्हाडे, पी. ए. बाविस्कर, प्रकाश पाटील, जयेश उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन एच. बी. मोतीराळे तर आभार एस. पी. बिऱ्हाडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here